सामाजिक भान / मदत
अहिल्यादेवी नगर-अकोले तालुक्यातील केळूगंन येथील रामचंद्र मांगे यांच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून भस्मसात झाल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले. सामाजिक बांधिलकी म्हणून .या कुटुंबाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने संसारोपयोगी साहित्य, महिला भगिनींना साडी व लहान मुलांना गणवेश वितरण करून आधार देण्यात आला.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष व रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य,रोटरी क्लबचे अध्यक्ष व मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सल्लागार विद्याचंद्र सातपुते, जिल्हा कार्यकारीणी सदस्य गोकुळ कानकाटे,विलास तुपे,
रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सचिन शेटे,सचिन देशमुख,पब्लिक इमेजचे डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख, राजूर चे उपसरपंच संतोष बनसोडे आदी उपस्थित होते.