नंदुरबारला जिल्हा सामान्य रुग्णालयात  स्वरक्षण साठी परिचारिकांना मिरची पूड पाकिटांचे वाटप

(छायाचित्र साभार-जय मल्हार न्यूज)

🔶 आरोग्य सेवा विभाग -स्वरक्षण संरक्षण 🔶 कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण 

नंदुरबार । कोलकाता येथील घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला आहे. कोलकता येथील आर जे  कार रुग्णालयात घडलेल्या  प्रकार पाहता आरोग्य विभागातील अनेक जण स्वसंरक्षण याबाबतीत माहिती घेतानाचे दिसून येत आहेत तर काही ठिकाणी वरिष्ठ आपल्या सहकर्मचाऱ्यांना या परिस्थितीत कसं सामोरे जायचे याबद्दल वेगवेगळे धडे देत आहेत त्यावर उपाय म्हणून नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांना मिरचीपूड पाकिटांचे वाटप केले. कोणीही छेड काढल्यास धाडस दाखवा. छेड काढणाऱ्यांविरुद्ध मिरची पूडचा वापर करा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोलकाता येथे महिला डॉक्टरबरोबर झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे मेणबत्ती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मिरचीपूड वाटपाचा कार्यक्रम झाला.
कोलकता येथील आर जे  कार रुग्णालयात घडलेल्या  प्रकार पाहता आरोग्य विभागातील अनेक जण स्वसंरक्षण याबाबतीत माहिती घेतानाचे दिसून येत आहेत तर काही ठिकाणी वरिष्ठ आपल्या सहकर्मचाऱ्यांना या परिस्थितीत कसं सामोरे जायचे याबद्दल वेगवेगळे धडे देत आहेत यातच नंदुरबार येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मिरची पुढचे पाकीट वितरित केले

स्वत: जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी परिचारिकांना या मिरचीपूड पाकिटांचे वाटप करत असे कृत्य जर आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात महिलांबरोबर करताना कोणी दिसले तर, मिरचीपूड आपल्या रक्षणासाठी त्याच्यावर फेकून आपला बचाव करा, असा सल्ला त्यांनी उपस्थित परिचारिका आणि महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला. दरम्यान अश्या प्रसंगात  आम्हीदेखील आमचे स्वरक्षण करु शकतो, इतकाच संदेश यातून द्यायचा असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी नमूद केले. शहरातून निघालेल्या या फेरीत जिल्हा सामान्य रुग्णालय. वैद्यकीय महाविद्यालय. परिचारिका महाविद्यालयासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.