राज्यस्तरीय कृषीमध्ये महोत्सव २०२४
बीड परळी वैजनाथ- राज्यामध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना नंतर लाडका शेतकरी ही योजना प्रारंभ करत असून त्याचे दोन हजार रुपये आजच बळीराजा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याप्रसंगी म्हणाले. राज्यस्तरीय कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पारंपरिक शेती, सेंद्रिय शेती, याबरोबरच तज्ञ मार्गदर्शना द्वारे शेतीसाठी लाभ होणार आहे.
बीड जिल्हा आणि परळी तालुक्यातील ऐतिहासिक असा पहिला राज्यस्तरीय कृषीमध्ये महोत्सवाचे उद्घाटन आजकेंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेल आदीं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती झाले. यावेळी नवीन दोन योजनांचा प्रारंभ परळी शहरातून करण्यात आला तर नमो कृषी योजनेचा चौथा हप्ता कळ दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात यावेळी जमा करण्यात आला.