🔶 निवड- नियुक्ती
परळी वैजनाथ– विश्वकर्मा क्रांती दल राज्यस्तरीय कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली. विश्वकर्मा क्रांती दलाच्या वतीने मागील सहा वर्षापासून सामाजिक राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत समाज संघटित करणे ,समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवणूक करणे, हे काम विश्वकर्मा क्रांती दलाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पांचाळ नांदेड यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात येत आहे
विश्वकर्मा क्रांती दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ सर यांनी नुकतीच कार्यकारणी घोषित केली आहे या कार्यकरणीवर श्री अनिल उत्तमराव पांचाळ सर परळी वै यांची कर्मचारी संघ समन्वयक पदावर वर्णी लागली आहे त्याबद्दल त्यांचे सुतार समाजाच्या वतीने अनेक ठिकाणी सत्कार व अभिनंदन होत आहे.
अनिल उत्तमराव पांचाळ सर हे संत तुकाराम विद्यालय नागापूर कॅम्प येथे शिक्षणाचे पवित्र कार्य करत आहेत हे कार्य करत असताना राज्यभरातील विश्वकर्मी समाजास व सुतार समाजाशी त्यांचा समाजकार्याच्या माध्यमातून संपर्क निर्माण झाला याची पावती म्हणून त्यांची विश्वकर्मा क्रांती दलाच्या समवयस्क या पदावर नेमणूक करण्यात आली या संघटनेच्या महत्त्वाच्या पदावर त्यांची वर्णी लागली आहे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
