🔷 नोकरी आणि संधी/ नोकरी मेळावा
बीड- परळी वैजनाथ / एम एन सी न्यूज नेटवर्क -वाढत्या शिक्षणाबरोबरच अनेक ठिकाणी नोकरीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातल्या त्यात अल्पशिक्षित युवकांसाठी तरुणांसाठी नोकरीच्या संधी कमी असतात, मात्र सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर्स या जागा शिक्षण कमी असूनही कौशल्यपूर्ण कार्य असेल तर त्या मिळू शकतात. पाचवी ते ग्रॅज्युएट या टप्प्यातील सर्वच लोकांना नोकरीची संधी मिळण्याचा भव्य नोकरी महोत्सव परळी शहरात 25 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील रत्नाकरराव गुट्टे यांनी आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवाचे निमित्ताने ते बोलत होते. एकूणच मागील तीन वर्षात त्यांनी सुमारे २० जॉब फेअर- नोकरी मार्गदर्शन मिळावे घेतले असून यातून सुमारे 10,000 युवकांना नोकरी मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितलं.
येत्या 25 ऑगस्ट रोजी परळी तालुका आणि परिसरातील युवक -युवती व बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी मिळाव्यात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या ज्येष्ठ नेत्या सुदामती गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक सुनील रत्नाकर गुट्टे यांच्याद्वारे आयोजित मराठवाड्यातील सर्वात मोठ्या नोकरी महोत्सवाचे आयोजन केले असून या भव्य रोजगार महोत्सवात हजारो व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन सुनील रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.
या महोत्सवात कमीत कमी पाचवी पास ते पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा आणि अंतिम वर्ष पदवी प्राप्त शैक्षणिक पात्रता असणाऱ्या व्यक्ती व बेरोजगारांना नोकरीचे संधी मिळणार आहे. या महोत्सवतात सुमारे 50 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग असून या नोकरी महोत्सवात ऑनलाईन नोंदणीसाठी स्कॅनर स्कॅन करून किंवा त्यांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर नोंदणी करता येत आहे. या मेळाव्यासाठी जवळपास 100 मुलींचे रजिस्ट्रेशन झाल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितल.
या मेळाव्यात बँकिंग, बीपीओ, व उत्पादन ऑटोमोबाईल, फर्टीलायझर, या क्षेत्रातील अधिक संधी असून या सोबतच कूशल ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, हॉस्पिटल सेवा, नर्सिंग स्टाफ ,मार्केटिंग, आदि कंपन्यात नोकऱ्यांच्या संधी असून, दिव्यांग उमेदवारांनाही कंपन्यांमध्ये 20% राखीव कोटा असतो त्यासाठी आमच्याकडे नोंदणी झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
🔶 दरम्यान काही तांत्रिक अडचणीमुळे मेळाव्याचे मेलवर डॉक्युमेंट्स ऑनलाइन अपलोड झाले नसतील त्यांनीही या मेळाव्यासाठी मेळाव्या स्थळी उपस्थित राहावे असेही सुनील गुट्टे आणि त्यांचे सहकारी बडे यांनी सांगितले.
नोकरी मेळावा स्थळ: हालगे गार्डन, वैद्यनाथ मंदिर परिसर, परळी वैजनाथ.
……………………………………………..
◾नोकरी मेळाव्यात होणाऱ्या इंटरव्यू, मुलाखत मध्ये कागदपत्रे आणि कामाचा अनुभव याबाबत उमेदवारांनी प्रामाणिक असायला हवं, आपण दाखल केलेली कागदपत्रे, दिलेली माहिती आणि अनुभवा संदर्भात केलेली वक्तव्य याची संबंधित कंपन्या पुनर पडताळणी करत असतात. तेव्हा जे सत्य आहे तेच सांगा. खोटी माहिती देऊ नका.
सुनील रत्नाकर गुट्टे
उद्योजक आणि आयोजक नोकरी मेळावा