मित्र मंडळाच्या वतीने भगवान बाबा जयंती उत्साहात साजरी!
परळी वैजनाथ प्रतिनिधी- राष्ट्रीय संत आणि ऐश्वर्या संपन्न संत म्हणून ओळख असलेले संत भगवान बाबा यांची जयंती सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने भगवान बाबा चौकात साजरी करण्यात आली. आयुष्यामध्ये त्यांनी गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले आणि शिक्षणाचे महत्त्व सर्व समाजाला समजावून सांगण्याचे कार्य त्यांनी केले असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
परळी येथील भगवान बाबा चौकामधील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीकांत चाटे,राहुल कांदे, शिवा बडे,काशिनाथ सरवदे,मुंजाभाऊ साठे,रणजित सुगरे,सतीश मुंडे,रवी मुंडे,अंगद कांदे,सचिन मुंडे,प्रवीण रोडे,सुंदर आव्हाड,संतोष कांबळे,बाळासाहेब चाटे, स्वप्निल आदी उपस्थित होते.