🔶पर्जन्यमान 🔷 पैठणच्या नाथसागरात पाण्याची आवक वाढली
नाशिक – छत्रपती संभाजी नगर- एम एन सी न्यूज नेटवर्क -नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग होतो आहे. दोन-तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल पासून जोरदार पाऊस सुरु असून, पावसाची संतत धार आजही कायम असल्याने काल दिनांक 24/08/2024 रोजी संध्याकाळी 06:00 वाजता गंगापूर धरणातून एकूण विसर्ग 7413 क्यूसेस सोडण्यात आले आहे, यात वाढ होऊ शकते
गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे पंचवटीतील गोदा पात्रात असलेल्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पाणी आले आहे.
पावसाचं प्रमाण सातत्यपूर्ण राहिले तर शरीरातील विसर्ग होणाऱ्या पाण्याच्या प्रमाणातही वाढ होणार असल्याची माहिती धरण पाणी व्यवस्थापन कडून कळवन्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्यास टप्या टप्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येईल यांची नागरिकांनी नोंद घ्यावी असेही कळवण्यात आलं आहे .
दरम्यान मराठवाड्याची मुख्य जलसंजीवनी असणारा पैठण येथील नाथसागर याचा मुख्य जलपुरवठा हा नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसावरच अवलंबून असतो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पैठण येथील नाथसागरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.