🔶 सत्कार, कौतुक सोहळा🔺सामाजिक
सोलापूर- आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा नुकताच देशभरात साजरा करण्यात आला. सोलापुरातही हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रति वर्षाप्रमाणे यंदाही श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवात अन्नदान करणारे अन्नदाते, उत्सवात सेवा करणारे सेवेकरी, मिरवणुकीत सहभागी असलेले सर्व मंडळे, सरकारी निम-सरकारी सेवा निवृत्त अधिकारी, कर्मचारी व वर्गणी प्रमुख आदींचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र भगवान जिव्हेश्वर विणकर समाजाचे आराध्य दैवत. भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा नुकताच महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोलापुरातील सुकुल साळी समाजाचे विठ्ठल मंदिर बेगम पेठ सोलापूर येथे आज दि. २५ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी १०.३० वा. या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी अन्नदाते, सात दिवस चालणाऱ्या सप्ताह निमित्त सेवा देणारे सेवेकरी, जन्मोत्सव सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपलं वेळ, सहयोग देणाऱ्या सर्व समाज बांधवांचा, विविध मंडळाचा, व्यक्तिगत आणि संस्था विशेष असा यथोचित गौरव करण्यात आला.
श्री जिव्हेश्वर युवक व युवती मंडळाचे अध्यक्ष यांचा सत्कार समारंभानंतर उपस्थितांसाठी अल्पपोहाराची ही व्यवस्था आयोजकाकडून करण्यात आली होती. दरम्यान या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने संस्थेतील विविध पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी आणि समाजबांधवानी उपस्थिती लावली होती. यावेळी अध्यक्षा सौ. शांताताई केंदोळे , उत्सव अध्यक्ष : श्री संतोष चिल्लाळ.व सर्व विश्वस्त, जन्मोत्सव समिती., सोलापूर हे उपस्थित होते.
