विधानसभा निवडणूक / अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : येऊ घातलेल्या दिवाळी पूर्वी किंवा दिवाळी नंतर विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वपूर्ण अश्या पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये पोलिस अधीक्षक, आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
१ शारदा राऊत – सध्या पदस्थापनेच्या प्रतीक्षेत, बदली- शेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा. २ निसार तांबोळी – सध्या – संयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, बदली पोलिस सहआयुक्त नागपूर शहर.
३ लोहित मतानी – सध्या -पोलिस अधीक्षक, भंडारा, बदली – सहाय्यक पोलिस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था.
४ नुरुल हसन – सध्या- पोलिस अधीक्षक, वर्धा., बदली – पोलिस अधीक्षक, भंडारा
५ नीलेश तांबे – सध्या -अप्पर पोलिस अधीक्षक, नंदुरबार. बदली – पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर

