सततधार पाऊस धरण पाणी साठा वाढला
नाशिक –छत्रपती संभाजीनगर-पैठण : गत चार पाच दिवस नाशिक, नगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात पाऊस पडत आहे. नद्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे या सतत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे जायकवाड़ी धरणामध्येदेखील पाण्याची वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील सततधार जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातदेखील पाण्याची आवक २७ हजार ५६२ क्यूसेकने सुरू आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातून सुमारे २८ टीएमसी पाणी जायकवाडी कडे आले आहे.
नाशिकसह जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांत संततधार पाउस होत आहे. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रातदेखील मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे गंगापूर धरणात पाणीसाठा वाढला असून, गंगापूरसह इतर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, हे पाणी गोदावरी पात्रातून जायकवाडी धरणात येत आहे. त्यातच जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे.
उपलब्ध माहिती नुसार नाशिकच्या गंगापूर धरणातून शनिवारी रात्री ८४२८ क्यूसेक पाणी, गौतमी गोदावरीतून २५६०, दारणातून १४,६७४ व सर्वांचा संकलित म्हणून नांदूरमध्यमेश्वरमधून ५२३०८ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर नांदूर मध्यमेश्वरमधून ५२ हजार क्यूसेकने विसर्ग नांदूरमध्यमेश्वर धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या पावसामुळे नांदूरमध्यमेश्वरच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून रविवारी दुपारी येथून ५२३०८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. दिवसभर हा विसर्ग तितक्याच क्षमतेने सुरू ठेवण्यात आला. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे दरम्यान धरण परिसरात येण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली असून धरणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.