आ. पंकजाताई मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथ, सोमेश्वराचे दर्शन

चौथ्या श्रावण सोमवारी परळीत भाविकांची तोबा गर्दी

परळी वैजनाथ- दि.२६। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आज श्रावण सोमवार निमित्त प्रभू वैद्यनाथ तसेच जिरेवाडी येथील श्री सोमेश्वराचे दर्शन घेतले. दोन्ही मंदिरात आज दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

आ. पंकजाताई मुंडे तसेच त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी आज सकाळी चौथ्या श्रावण सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन अभिषेक केला व मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान आ. पंकजाताई मुंडे व प्रज्ञाताई मुंडे यांनी जिरेवाडी येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री सोमेश्वराचेही मनोभावे दर्शन घेतले. याठिकाणी सुरू असलेल्या कीर्तनातही त्यांनी हजेरी लावली.
••••