🔺सोमवारी पहाटे ५ पासून रांगा🔺 शिवमुठ जव,🔺 अनेकांच्या श्रावणवृत्ताची आज सांगता🔺पर राज्यातील भाविकांची लक्षणीय गर्दी
बीड-परळी वैजनाथ / एम एन सी न्यूज नेटवर्क:- आजच्या चौथ्या सोमवारी जन्माष्टमीचा योग जुळून आला यामुळेच तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथील श्री ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासह पुरातन अशा झुरळे गोपीनाथ येथील भगवान विष्णूच्या दर्शनासही भाविक भक्तांची मोठी गर्दी शहरात आज होती.या मंदिरात आयोजित जन्माष्टमी सोहळ्यासही भाविकांची मोठी गर्दी याप्रसंगी दिसून आली.
देशभरातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ नगरीत तिसऱ्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने रविवारीच शहरात भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मंदिरात राज्यभरातील भाविक तसेच शेजारच्या राज्यातील अनेक श्रद्धाळू भाविकांनी मंदिर परिसरात हर हर महादेव, शंभू महाराज की जय असा शिवनामाचा जयघोष करीत होते. आजच्या चतुर्थ श्रावणी सोमवारी जन्माष्टमीचाही वेग योग जुळून आल्यामुळे भाविक भक्तात वेगळाच उत्साह आज दिसून आला परिसरातील अनेक मंदिरात जन्माष्टमीचा सोहळा आज संपन्न झाला. देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या हजारो भाविकांची श्रावणातील या चतुर्थ सोमवारी मोठी गर्दी होती.
चतुर्थ सोमवारच्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळीच मंदिर परिसर गजबजून गेला होता. हजारो भाविकांनी रविवारी सायंकाळीच प्रभुवैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. बम बम भोले, हर हर महादेव, घोषणांनी मंदिर परिसर दमानून गेला होता. अनेक संस्था आणि व्यक्ती गत फराळ, पाणी, लाडूंचे वाटप करणाऱ्याची ही मोठी संख्या होती. चतुर्थ श्रावण सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली. लाखों भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले आहे. ‘हर हर महादेव’ चा जयघोष नित्य चालूच होता.दरम्यान मंदिर परिसरात मोठा चौख पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता.
◾………………………………………..
चतुर्थ श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण जन्म अष्टमी या योगामुळे परिसरातील सर्वच मंदिरात अनेक कार्यक्रमा आयोजित करण्यात आली होती मंदिर परिसरातील सर्वच लहान मोठी मंदिर गर्दीने फुलून गेली होती.
परिसरातील अनेक मंदिरात जन्मोत्सव ,पाळणा भजन विविध सप्ताह आणि धार्मिक कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले होते परळी परीसरातील रत्नेश्वर , सोमेश्वर, संत जगमित्र नागा मंदिर,सूर्वेश्वर मंदिर आदी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून आली.
🔺◾ श्रावण महिन्यानिमित्त आणि ज्योतिर्लिंग प्रभू-वैद्यनाथाच्या दर्शनाला येणाऱ्या देशभरातील भाविक भक्तां बरोबरच मंदिर सुरक्षा यासाठी मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे .
🔺◾ तर अनेक सेवाभावी संस्था व्यक्तिगत यांनी भाविक भक्तांसाठी शाबुदाणा खिचडी बटाटा चिप्स आधी फराळाच्या साहित्याची मोफत सोय केली होती धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नात प्रतिष्ठाननेही या उपक्रमात गेली सर्व सोमवार पाणी फराळ व्यवस्था केली आहे.
🔺◾सुरक्षितता- मंदिर आणि भक्तांच्या सुव्यवस्थेत दर्शनासाठी एक पोलीस उपाधीक्षक, एक पोलीस निरीक्षक, 15 सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुमारे 87 पुरुष पोलीस कर्मचारी, 21 महिला पोलीस कर्मचारी, एक दंगल नियंत्रण पथक (सुमारे 40 कर्मचारी)
आणि १०० होमगार्ड असा एकूण बंदोबस्त आहे.