प्रामाणिक / सकारात्मक – सुखद
परळी वैजनाथ – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे सध्या श्रावण महिन्याचा पर्वकाळ सुरू असुन या निमित्ताने राज्य व परराज्यातून असंख्य भाविक परळी दाखल होत असतात. अतिशय गर्दी व मंदिर परिसरात असलेल्या घाईगडबडीत अनेकांचे किंमती सामान, दागिने, पाकीट वगैरे गहाळ होते. मात्र परळी येथील स्थानिक नागरिक याबाबत नेहमीच सकारात्मक प्रामाणिक असल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी बघायला मिळाली आहेत. अशाच प्रकारचे एक उदाहरण परळीच्या एका प्रामाणिक रिक्षावाल्याने ही आज दाखवून दिले आहे.
शेजारील कर्नाटक राज्यातील बिदर येथील भाविक सहकुटुंब प्रभू वैद्यनाथचे दर्शन घेण्यासाठी परळी वैजनाथ येथे आले होते. त्यांचे किमती सामान व मोबाईल किंमत 25000 असे रोडवर पडले. ते भाविक तसेच निघून गेले प्रभू वैजनाथ दर्शनानंतर या भाविकांच्या ही बाब लक्षात आली. मात्र या ठिकाणी उपस्थित असलेल्या परळीतील रिक्षा चालक अमोल गित्ते रा. परळी वैजनाथ यांना रस्त्यावर मोबाईल वही किमती सामान दिसले या रिक्षाचालकाने कोणाचे सामान पडले का याची चौकशी केली मात्र मूळ मालकाचा शोध ते घेऊ शकले नाही. दरम्यान त्यानी प्रामाणिकपणे पोलीस स्टेशन परळी शहर येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार मुजमुले ,पोलीस अमलदार मोहन दुर्गे यांच्याकडे आणून दिले. दरम्यान शहर पोलिसांनी या भाविकांचा शोध घेऊन व शहानिशा करून त्यांचे किमती सामान व मोबाईल त्यांना परत केले. मंदिर व परिसरात असलेली गर्दी व घाईगडबडीच्या व सार्वजनिक ठिकाणी गहाळ झालेल्या , रस्त्यावर पडलेल्या किमती वस्तू अतिशय सकारात्मकता दाखवून प्रमाणिकतेने पोलिसांपर्यंत व भाविकांना ते परत करण्यापर्यंत भूमिका घेणाऱ्या या रिक्षाचालकाचे शहर पोलीस ठाण्याचे पो.नी लोहकरे यांनी अभिनंदन केले आहे.
![](https://maharashtranewsconnect.com/wp-content/uploads/2024/10/महत्वपूर्ण-ताज्या-घटना-घडामोडी-प्रवास-पर्यटन-स्थळे-खाद्यसंस्कृती-नोकरी-याची_20241001_091754_0000.jpg)