लाईन ब्लॉक -सतना-बरेठीया या नवीन रेल्वे लाईन चे काम
छत्रपती संभाजीनगर : जालना ते छपरा विशेष रेल्वे गाडीच्या सतना-रेल्वे स्थानकावर सतना-बरेठीया या नवीन रेल्वे लाईनचे काम होत आहे. या कामासाठी लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे जालना-छपरा-जालना विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मराठवड्यातून बिहार येथील छपरा मराठवड्यातून बिहार येथील छपरा जंक्शन या मार्गावर धावणाऱ्या गाडीचे जालना ते छपरा हे अंतर १६०५ किमी आहे. ही गाडी जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, भुसावळ,खंडवा,हरदा, इटारसी, पिपरिया,जबलपूर,कटणी जंक्शन,महीर, सतना जंक्शन,प्रयागराज जंक्शन, बनारस,गाजीपूर सिटि, छपरा जंक्शन अशी धावते. दि. १८ आणि २५ सप्टेंबरला गाडी क्रमांक ०७६५१ जालना ते छपरा विशेष गाडी, तर परतीच्या प्रवासात २० आणि २७ सप्टेंबरला धावणारी गाडी क्रमांक ०७६५२ छपरा ते जालना विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे.