तालुक्यातील परळी-बीड, परळी गंगाखेड, ममदापुर आदि ठिकाणी संपर्क तुटला आहे
बीड/परळी-वैजनाथ – शहर आणि परिसरात आज सकाळ पासून संतत धार पाऊस सुरू आहे. आभाळ भरून आले आहे. शहरी भागातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. तर शेतकऱ्यांना पोळ्याच्या बाजारात पावसामुळे मोठा व्यत्यय आला अनेक बैलपोळ्यासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यास शेतकरी बांधवांना पावसामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
काल दि १ सप्टेंबर सकाळी सात वाजल्यापासून मध्यम ते जोरदार पाऊस पडतो आहे. सुमारे सहा ते सात तासांपासून सतत कोसळत असून या पावसाने घराबाहेर निघणे अवघड झाले. एकूणच मिळालेल्या माहीत नुसार जिल्हाभर सतत पाऊस पडतं आहे. पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून बाजारपेठा देखील ठप्प झाल्या आहेत.
तालुक्यातील परळी-बीड, परळी गंगाखेड, ममदापुर आदि ठिकाणी संपर्क तुटला आहे
तसेच शहरातील विविध रस्ते पाण्याखाली गेले असून सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले आहे. तर तालुक्यातील अनेक छोट्या मोठ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले असून परळी अंबाजोगाई मार्गावरून कन्हेरवाडी गावातून त्याच खालोखाल असणाऱ्या जिरेवाडी लगत वाहणाऱ्या ब्रह्म गंगा नदीस मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. 31 तारखेच्या रात्री कमी अधिक प्रमाणात सुरू झालेला पाऊस आज दोन सप्टेंबर रोजी ही सकाळ पासून चालूच आहे. परळी तालुका आणि परिसरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

