परळीत सरस्वती नदीला पूर; जुना गाव भाग, रेल्वे लाईन लगत , इंदिरानगर, बरकत नगर मोठ्या प्रमाणात पाणी शिरले

🔷 आपत्ती 🔺पुराचे पाणी घरात,

🔷 नदीपात्रात नगर परिषदेने बांधलेल्या व्यापारी गाळ्यामुळे  पाणी वाहून जाण्यास मोठी अडचण, 🔺दहा वर्षापासून एकही गाळा वापरात नाही.

बीड/परळी-वैजनाथ – एम एन सी न्यूज नेटवर्क. शहर आणि तालुक्यातील दोन दिवसांत सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे आज पहाटे जुन्या गाव भागातील सरवस्ती नदीला मीठ पूर आला पुराचे पाणी पुलावरून वाहत आहे. पुलां नजीक राहणाऱ्या डॉ. टाले यांच्या घरात पाणी घुसले. नदीपात्रात दोन ठिकाणी उभारलेल्या गाळ्यामुळे पुराचे पाणी वाहून जाण्यास मोठी अडचण नागरिकात संताप.

शहर आणि परिसरात  संतत धार पाऊस सुरू आहे. आभाळ भरून आले आहे. सकाळ पासून पाऊस सुरूच आहे.शहरी भागातील अनेकभागात  , कीर्ती नगर, कृष्णा नगर, इंदिरानगर, बरकत नगर, कन्या शाळेचा जुने शनी मंदिर रेल्वे लाईन नजीक च्या  रहीवाशी भागातील  अनेक वस्त्यात  मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. शहरात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. नगरपरिषदेने दहा वर्षांपूर्वी या सरस्वती नदीच्या पात्रात दोन ठिकाणी मध्यभागी गाळे बांधले आहेत. त्यामुळे उरलेले जागेत नागरिकांनी आपल्या बांधकामाचा राडा आणून टाकला आणि नदीचे पात्र कमी होत गेले. त्यामुळेच आज आंबेवेश भागात पाणी पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहत आहे.

दि १ सप्टेंबर सकाळी सात वाजल्यापासून मध्यम ते जोरदार पाऊस आत्ता पर्यंत पडतो आहे. सुमारे ४८ तासापासून कमी अधिक स्वरूपातील पावसामुळे परिसरातील नदी- नाले यांना मोठा पूर आला आहे तासांपासून सतत कोसळत असून या पावसाने घराबाहेर निघणे अवघड झाले आहे.

नपचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, संतोष रोडे आणि स्वच्छता कर्मचारी या भागात परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आवश्यक तेथे पाण्यात उतरून तात्काळ सफाईची काम केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र न्यूज कनेक्ट ला मुख्याधिकाऱ्यांनी दिली.