राजस्थान उत्तरलाई एअरबेसजवळ मिग २९ कोसळले

छायाचित्र साभार- एनडीटीवि राजस्थान

विमाणिक बचावला 

जयपूर : राजस्थानमधील बारमेरनजीकच्या उत्तरलाई एअरबेसजवळ सोमवारी रात्री लढाऊ विमान कोसळले. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातापूर्वी पायलट विमानातून बाहेर पडला होता.
हे लढाऊ विमान निवासी भागापासून दूर कोसळले आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच बारमेरचे जिल्हाधिकारी निशांत जैन, पोलीस अधीक्षक नरेंद्र सिंह मीना आणि जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. संरक्षण पीआरओ अजिताभ शर्मा यांनी सांगितले की, मिग-२९ हे लढाऊ विमान कोसळले आहे.
पोलीस अधीक्षक नरेंद्र सिंह मीणा म्हणाले की, लढाऊ विमानाचा अपघात बाडमेर उत्रलाई एअरबेसजवळ झाला. विमान जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातापूर्वी वैमानिकांनी विमानाला निर्जन ठिकाणी नेले.