पुन्हा संप,एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलनाचे हत्यार

🔶 सार्वजनिक प्रवाशी वाहतूक व्यवस्था – रापम कर्मचारी संपावर 

मुंबई : राज्यभरात सर्वाधिक प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यानी संपाचे हत्यार पुन्हा उपसले आहे . एकूणच याचा परिणाम गौरी गणपती साठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशी नगरिकाना बसणार आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या  विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावरबैठका झाली मात्र यात समाधान कारक  तोडगा निघाला नाही.

दरम्यान ऐन गणेशोत्सवाच्या आणि गौरी आगमनाच्या  तोंडावर ३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. संप लांबला तर याचा अतिरिक्त तान रेल्वे आणि खाजगी बसेस वर होईल. खाजगी बसच्या जादादर मुळे अधिकचा खर्च होणार आहे .

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी प्रमुख मागण्या मध्ये

🔶 शासकीय कर्मचायांप्रमाणे वेतन.
🔶 २०१८ ते २०२४ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी.
🔶 शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ.
🔶 ५८ महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी.
🔶  मागील ५७ महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी. आदि मागण्या आहेत.