मत्स्य व्यवसाय विभाग
बीड/परळी वैद्यनाथ – परळी वैद्यनाथ जिल्हा बीड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन दिनांक 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2024 या कालावधीत करण्यात आले होते. यामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने स्टॉल उभारण्यात आला होता.
दरम्यान राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024 मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या स्टॉलला पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली यावेळी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, बीड कार्यालयाच्या वतीने मत्स्यव्यवसाय विभागातील विविध योजनांची प्रामुख्याने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, राज्य स्तरीय योजना, मत्स्यव्यवसायासाठी किसान क्रेडिट कार्ड, अपघात गट विमा, ई- श्रम कार्ड योजना तसेच गोड्या पाण्यातील कोळंबी, मत्स्यव्यवसाय माहिती पालक मंत्री, मत्स्यशेतकरी, मत्स्यसंस्था चालक यांना देताना श्री. भास्कर सानप, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय बीड व डॉ. अजय सोनवणे, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी बीड तसेच श्री. सुभाष आघाव दिसत आहेत