🔸मतदार संघ – मंतदार यादी -नवं मतदार – विधानसभा निवडणूक २०२४
🔹मतदार यादीतील नोंदी सोबत मतदारांनी आपला मोबाईल नंबर लिंक करण्याचाबत उपक्रम
🔹सर्वाधिक मतदार नोंदणी 230 बीड विधानसभा मतदार संघा-1,0971 तर सर्वाधिक कमी मतदार नोंदणी ही 232 केज विधानसभा मतदार संघामध्ये 7,220 एवढी नविन नोंदणी.
बीड : बीड जिल्हयातील सहा विधानसभा मतदार संघात एकूण 21 लाख 97 हजार 830 मतदार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दि. 01.07.2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा दुसरा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार पुनरीक्षण पूर्व उपक्रम राबविण्यात आल्यानंतर प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली व प्रारुप मतदार यादीवर दिनांक 06/08/2024 ते 20/08/2024 या कालावधीमध्ये दावे व हरकती स्वीकारण्यात आले, व दावे व हरकती निकाली काढल्यानंतर दिनांक 30 ऑगस्ट, 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघ, तहसिल कार्यालये, सर्व मतदान केंद्राचे ठिकाणी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंतिम मतदार यादीनुसार बीड जिल्हामध्ये पुरुष मतदार 11.58,998, स्त्री मतदार 10,38,809 व तृतीयपंथी मतदार 23 असे एकूण 21,97,830 मतदार आहेत.
🔸 विधानसभा निहाय मतदार
🔹 विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्या पुढील प्रमाणे-
🔹228 गेवराई विधानसभा मतदार संघ मध्ये पुरुष मतदार 1,97,308, स्त्री मतदार 1,76,910 व तृतीयपंथी मतदार 03 असे एकूण 3,74,221 मतदार आहेत.
🔹229 माजलगाव विधानसभा मतदार संघ मध्ये पुरुष मतदार 1,83,505, स्त्री मतदार 1,63,692 व तृतीयपंथी मतदार 01 असे एकुण 3,47,198 मतदार आहेत,
🔹230 बीड विधानसभा मतदार संघ मध्ये पुरुष मतदार 2,00,099, स्त्री मतदार 1,78,071 व तृतीयपंथी मतदार 10 असे एकुण 3,78,180 मतदार आहेत,
🔹231 आष्टी विधानसभा मतदार संघ मध्ये पुरुष मतदार 2,03,838 स्त्री मतदार 1,79,191 व तृतीयपंथी मतदार 01 असे एकूण 3,83,030 मतदार आहेत,
🔹232 केज विधानसभा मतदार संघ मध्ये पुरुष मतदार 2,00,285 स्त्री मतदार 1,81,817 व तृतीयपंथी मतदार 05 असे एकुण 3,82,107 मतदार आहेत.
🔹233 परळी विधानसभा मतदार संघ मध्ये पुरुष मतदार 1,73,963, स्त्री मतदार 1,59,128 व तृतीयपंथी मतदार 03 असे एकुण 3,33,094 मतदार आहेत.
अंतिम मतदार यादीमध्ये 230 बीड विधानसभा मतदार संघामध्ये सर्वाधिक मतदार नोंदणी 1,0971 एवढे तर सर्वाधिक कमी मतदार नोंदणी ही 232 केज विधानसभा मतदार संघामध्ये 7,220 एवढी नविन नोंदणी झाली आहे.
नव मतदार-228 गेवराई मतदार संघामध्ये 9743 नवमतदार, 229 माजलगाव विधानसभा मतदार संघामध्ये 7539 नवमतदार, 231 आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये 9263 नवमतदार, 233 परळी विधानसभा मतदार संघामध्ये 7441 नवमतदार यांची नोंदणी झाली आहे.
या कालावधीमध्ये मतदार यादीतील नोंदी सोबत मतदार यांनी आपला मोबाईल नंबर लिंक करण्याचाबत उपक्रम राबविले आहेत व यापुढे देखील मोबाईल नंबर लिंक करणे चालू आहे करीता सर्व मतदारांनी आपल्या मतदार यादीतील नोंदीसोबत मोबाईल नंबर लिंक करावे असे जिल्ह्यातील नागरीकांना अवाहन करण्यात येत आहे.