धरण्याचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता.

◾जायकवाडी तुन आज गोदावरीत पाणी;

छत्रपती संभाजी नगर – पैठण : जायकवाडी चा मुख्य जलसोत्र असणारी धरण नाशिक जिल्ह्यातच आहेत. नाशिक जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मुख्य धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. या धरणातून होणारा विसर्ग जायकवाडीत येऊन पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यात आणि जायकवाडी धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याच्या जवळ पोहोचला आहे. धरणात शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ९४.५० टक्के जलसाठा असल्याची नोंद झाली आहे, सातत्याने धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे आज रविवारी दुपारपर्यंत किंबहुना सायंकाळी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याची विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येऊ शकतो.

यंदाच्या पाऊस काळात नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर सुरुवातीपर्यंतच महत्त्वपूर्ण सर्व धरण ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून हा विसर्ग आता जायकवाडीत येऊन पोहोचला आहे दरम्यान पैठण तालुक्यात आणि धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण उर्फ होण्याच्या जवळ पोहोचले आहे. शनिवारी धरणातील पाणीसाठा सुमारे 95 टक्के पर्यंत पोहोचला होता त्यामुळे आज कुठल्याही क्षणी धरणाची दरवाजे उघडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माती धरणात सर्वाधिक मोठे असलेले धरण म्हणून जायकवाडी प्रकल्पाची गणना होते. जायकवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता १५२२ फूट असून, सध्याची पाणी पातळी १५२१ फूट झाली आहे. यातील जिवंत पाणीसाठा २०५१.५२४ दलघमी आहे. सातत्याने धरणात पाण्याची आवक २० हजार क्युसेक पेक्षा अधिक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गोदावरी नदीवरील गावांना सतर्क राहण्याबाबत छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, नांदेड आणि अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित तहसीलदारांनी सतर्क राहण्याबाबत प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे