🔹पर्यटन -भटकंती 🔹 सफर -प्रवास
के नमिता प्रशांत (अमरावती) – प्रवासात जेव्हा जेव्हा रस्त्याच्या कडेला मला असे माईलस्टोन म्हणजेच ‘मैलाचे दगड’ दिसतात. ते थांबून किंवा सावकाश होऊन बघणे वाचणे फार आवडतं. कधीकधी तर एवढी अडचण व्हायची कीं हे मैलाचे दगड शोधत शोधत जावे लागायचे. आम्ही कित्येकदा रस्त्यावर उतरून झाडांझूडपात लपलेले मैलाचे दगड साफ केलेले आहेत. जेणेकरून आमच्यासारखीच इतर कुणालाही अडचण होऊ नये. परंतू आता आपली जी पी एस बाई कुठेतरी नक्कीच नेवून सोडते हे नक्की..बरेचदा तळ्याच्या काठावरपण..

असो… आपल्याही जीवनात असे मैलाचे दगड असावेत हे मी खूप आधीच ठरविलं होतं. नंतर नंतर असं लक्षात आलं, अशाने आपली दमछाक होऊ शकते त्यामुळे मी माझे मैलाचे दगड इतके हलकेफुलके बनविलेत, कीं जेणेकरून जागेवरूनच फुंकर मारली तरी ते आणखी जरासे दूर जातील आणि मला तिथवर पोहोचायला सहजता लाभेल….
आहे कीं नाही गंमत 
बाकी तुम्हांला तर माहितीच आहे कीं, मैलांच्या दगडांचे रंग ठरलेले असतात..यदाकदाचित कुणाला माहिती नसेलच तर मी येथे त्यांच्यासाठी मुद्दाम सांगते.

















ग्रे
रंग मला प्रचंड आवडतो पण या रंगांचा मैलाचा दगड मला माझ्या आयुष्यात असावा असं मुळीच वाटत नाही आणि हिरव्या रंगांच्या सर्व छटांचे मैलांचे दगड माझ्या आयुष्यात असावेत असंही वाटतं.






आणि गंम्मत म्हणजे ज्यावर शून्य
राहील असा ‘मैलाचा दगड’च आपल्याला आपल्या आयुष्यात नको रे बाबा क्योंकी, “जिंदगी चलने का नाम हैं..”




– नमिताप्रशांत 

