परळी शहरातील पूरग्रस्त कुटुंबांना नाथ प्रतिष्ठान कडून 10 हजार तर प्रशासनाकडून 5 हजारांच्या मदतीचे मुंडेंच्या हस्ते वितरण

परळीकरांची सेवा हा माझा धर्म आणि कर्तव्य, अखेरच्या श्वासापर्यंत निभावत राहीन – धनंजय मुंडे

आतापर्यंत 550 पेक्षा अधिक कुटुंबांना मदत मंजूर, 35 कुटुंबांना प्रातिनिधिक स्वरूपात चेकचे वितरण, उर्वरित कुटुंबांना दोन दिवसात घरपोच वितरण

परळी वैद्यनाथ – आज राजकारणात व समाजकारणात जो काही आहे तो केवळ आणि केवळ परळीतील जनतेच्या आशीर्वादामुळे आहे. त्यामुळे सत्ता असो नसो, परळीकरांची सेवा करणे हा माझा धर्म आणि माझं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य मी अखेरच्या श्वासापर्यंत निभावत राहीन, असे मत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त कुटुंबियांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे.

परळी वैजनाथ शहरातील सरस्वती नदीला मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आल्याने पुराचे पाणी काही घरांमध्ये शिरून कौटुंबिक साहित्य, कपडे, भांडी, अन्नधान्य आदींचे नुकसान झाले होते. त्यांना तात्काळ दिलासा म्हणून धान्याच्या किट देण्यात आल्या, त्याचबरोबर प्रशासनाच्या नियमानुसार तहसील कार्यालयामार्फत प्रत्येक बाधित कुटुंबाला प्रत्येकी पाच हजार रुपये तर कृषिमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत तब्बल दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे.

या मदतीचे आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 35 कुटुंबांना धनादेश स्वरूपर वितरण करण्यात आले. तर उर्वरित कुटुंबांना सोमवार व मंगळवार या दोन दिवसात घरपोच वितरण करण्यात येईल. ही मदत एकूण 550 पेक्षा अधिक कुटुंबांना देण्यात येणार असून कुटुंबांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती मध्ये नाथ प्रतिष्ठान पुढाकार घेत परळीवासीयांच्या मदतीला पावलोपावली धाव घेत असते. आर्थिक दुर्बल कुटुंबातील हजारो मुलींचे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कन्यादान करण्याचे कामही नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आजवर करण्यात आलेले आहे. कडक लॉकडाउनच्या काळात देखील हजारो कुटुंबांपर्यंत अन्नधान्य किराणा भाजीपाला तसेच औषधी ते अगदी रेमडिसिव्हीर मोफत पोहोचवण्याचे काम सुद्धा नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. दिवाळी, ईद, गणेशोत्सव यासारख्या सणांच्या काळामध्ये देखील नाथ प्रतिष्ठानने अनेक वर्षांपासून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

यावेळी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शकील कुरेशी, अय्युब पठाण, शंकर आडेपवार, विजय भोयटे, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी, उपाध्यक्ष शंकर कापसे, अजीज कच्छी, अन्वर मिस्किन, इस्माईल पटेल, रवी मुळे, अनंत इंगळे, अल्ताफ पठाण, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य अनेराव, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष गोविंद कराड, लाला खान, गफार काकर, जावेद कुरेशी, राजू शेख, सुरेश नानवटे, गौस कुरेशी, अश्फाक शेख, नायब तहसिलदार बाबुराव रुपनर, न.प.चे कार्यालय अधीक्षक संतोष रोडे यांसह आदी उपस्थित होते.