परळी वैजनाथ – परळी फेस्टिवल च्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा आणि आरती विधियुक्त पद्धतीने परळी फेस्टिवलचे संस्थापक तथा मार्गदर्शक प्रा.टी.पी.मुंडे सरांच्या शुभ हस्ते येथील जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालयामध्ये संपन्न झाली. महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे संकट दूर कर आणि राज्यातील शेतकऱ्यावरील दुःखाचा डोंगर कमी करून त्याची शेती पिकू दे असे साकडे गणरायाकडे त्यांनी घातले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परळी फेस्टिवल ही एक अग्रगण्य सांस्कृतिक चळवळ त्यांनी परळी शहरांमध्ये पुणे फेस्टिवलच्या धरतीवर उभी केली. परळी फेस्टिवलच्या माध्यमातून परळीकरांना अकरा दिवस मनोरंजनाची मेजवानी मिळते. यामध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक मनोरंजनात्मक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात परंतु यावर्षी हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये कीर्तन, कव्वाली, भीमगीते , लावणी आणि इतर कार्यक्रम परळीकरांसाठी आयोजित केले जातात. परळी फेस्टिवल श्रीच्या स्थापनेचे हे 25 वे पुष्प आहे.
यावेळी शिवरत्न काका मुंडे, जनार्दन गाडे गुरुजी, आत्माराम कराड, शफी भाई, भीमसाम राठोड, दत्तात्रय ढवळे,प्रा.विजय मुंडे, अँड.सुनील सोनपिर,रघुनाथ डोळस, बाळकृष्ण लोंढे, अँड.मनोज संकाये,मिलिंद क्षीरसागर, श्रीमंत कांगणे, नागेश व्हावले, प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे,राहुल कांदे,शिवा बडे, स्वप्निल दराडे ,बालाजी चाटे,शिरीष सलगरे,सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.