हेमामालिनी प्रस्तुत राधा रास -बिहारी,उच्च अभिरुचि पूर्ण सादरीकरण

छायाचित्र -मयूर आरबूने

 🔶 वैद्यनाथ गणेश महोत्सव/ हेमामालिनी प्रस्तुत राधा रास -बिहारी. 🔶वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या हेमामालिनी यांनी साकारलेल्या राधेची जाणत्या परळीकरांना भुरळ

बीड/परळी-वैजनाथ- एम एन सी न्यून नेटवर्क-महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक चळवळ जोपासली आहे. त्यांच्या माध्यमातून परळीकरांना एकापेक्षा एक सरस सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात. धनंजय मुंडे हे इथले आमदार व मंत्री म्हणून विकासाच्या कार्यात मग्न असतात असे म्हणत ड्रीम गर्ल म्हणून अख्ख्या देशात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ सिने अभिनेत्री खा.हेमामालिनी यांनी धनंजय मुंडे यांचे परळी येथील वैद्यनाथ गणेश महोत्सवात भरभरून कौतुक केले.

सत्तरच्या दशकातील स्वप्नसुंदरी अशी विशेषण मिळालेली सुंदर आणि आजही आपल्या शास्त्रीय नृत्य संगीता द्वारे कार्यरत असलेल्या हेमा मालिनी यांचा स्टेज परफॉर्मन्स परळीकरांना अपूर्वी अशी पर्वणी च होता. पौराणिक कथांवर आधारित नृत्याचे कार्यक्रम करणाऱ्या खासदार हेमामालिनी यांचा राधा रासबिहारी हा कार्यक्रम नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ महोत्सवात त्यांनी सादर केला. परळी येथे ना धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सुरू असलेल्या श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवात हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘राधा रासबिहारी’ या संगीत नाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

या नाटिकेमध्ये वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या हेमामालिनी यांनी साकारलेल्या राधेने आणि सोबतच श्रीकृष्ण व गोपिकांची रासलीला तसेच सुदामापासून कंसापर्यंतच्या विविध साकारलेल्या भूमिका आदींनी परळीकरांना अक्षरशः भुरळ घातली. अतिशय उच्च अशी अभिरुची संस्कार, नृत्य अभिनय, संगीत या सर्वच बाबींनी उच्च कोटीचा असणारा हा कार्यक्रम परळी सादर झाला. दरम्यान हेमामालिनी यांना अभिप्रेत असा प्रेक्षक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. मध्येच उठून जाणारे प्रेक्षक, चालत बोलत फिरणारे प्रेक्षक यांच्यामुळे दर्जेदार आणि सहकुटुंब सहपरिवार यांच्यासह पाहता येणार हा एकमेव कार्यक्रमास मात्र प्रेक्षकांच्या अल्प प्रतिसाद दिसला.

🔶विविध वेशभूषा साकारलेल्या सुमारे 50 कलाकारांचे दिग्दर्शन व निर्मिती स्वतः हेमा मालिनी यांनी केले होते त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराच्या मेकअप पासून ते वेशभूषेपर्यंत सर्वांची तपासणी सुद्धा त्या स्वतः करत होत्या. या वयात कलेप्रती त्यांचा उत्साह पाहून नवोदित कलाकारांना नक्कीच प्रेरणा मिळेल.

🔶अभिनेत्री तथा खासदार हेमामालिनी यांचे नाथ प्रतिष्ठानच्या वतीने सौ राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी स्वागत केले त्याचबरोबर नाथ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आलेल्या सर्व कलाकारांचे यथोचित स्वागत यावेळी करण्यात आले.