🔶 ठाणे गणेशोत्सव- ठाणे बदलतंय
स्वा. सावरकरनगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाचा उपक्रम
ठाणे: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे ठाणे बदलतंय… राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरनगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या ५४ व्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर आगळावेगळा देखावा साकारला आहे. शिवसेना गटनेते व मा. नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेल्या ‘ठाणे बदलतंय’ या वर्षभर चालणाऱ्या ‘ठाणे बदलतंय’ प्रचार-प्रसार उपक्रमाची सुरवात शनिवार दि. ७ सप्टेंबर ते मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीने देखाव्याने होणार आहे,
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे नगरातील ठाणेकर हे उत्सवप्रिय, शांतताप्रेमी, संयमी, आनंदी, हौशी स्वभावाचे आहेत.शहराच्या भौगोलिक आणि वैचारिक विकासात त्यांचा वाटा मोलाचा आहे.ठाण्याची नव्या युगाकडे होणारी प्रगतीशील वाटचाल, जागतिक पातळीवर सुरू असणाऱ्या विकास कार्यात आपल्या ठाणे शहराचा सहभाग, सर्वांगीण स्वरूपाची उच्च मूल्ये या देखाव्यात दिसणार आहेत. आतातर, ठाणे हे स्थानक एक गजबजलेले रिअल इस्टेट हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे, येत्या काळात सर्व पातळीवर बदलणाऱ्या ठाण्याचा वेध घेतला जात आहे. या बदलांना नेमकेपणाने टिपण्यासाठी दिलीप बारटक्के यांनी गणेशोत्सवात देखाव्याचे समयोचित आयोजन केले आहे.
या देखाव्यात ठाणे शहरातील नवीन विविध पायाभूत प्रकल्प, रस्ते आणि रेल्वे मार्गांचे जाळे,ठाण्याशी जोडली जाणारी दळणवळण साधनं, होऊ घातलेला महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, घोडबंदर रोड, भिवंडी-बायपास, शहरांतर्गत मेट्रो मार्ग, आगामी मेट्रो मार्ग यांमुळे वडाळा, मीरा रोड, कल्याणसारख्या भागांशी सहज होणारा ठाण्याचा संपर्क, ठाण्यातील निवासी मालमत्ता, येऊर हिल्स, निसर्ग, डोंगरराजी, पाणवठे, ३५ तलाव, २१ एकरातील नमो ग्रँड सेंट्रल पार्क, वागळे इस्टेस्टचा इंडस्ट्रियलपासून कमर्शिअलपर्यंतचा बदल आणि जुन्याची कात टाकून प्रगतीकडे होणारी शहराची वाटचाल… यांचे दर्शन हे या देखाव्याचे खास आकर्षण असेल.
तसेच ‘ठाणे बदलतंय’ या उपक्रमातून ठाण्यात येणारे केंद्र शासन,राज्य शासन,शासनाचा विविध संस्था महामंडळे, ठाणे महानगर पालिका या सर्वांचे विविध प्रकल्प योजना सुद्धा टीव्ही स्क्रीन, सोशल मीडिया माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत, याच बरोबर, ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोष वाक्य स्पर्धा, उखाणे स्पर्धा, रील स्पर्धा, मान्यवरांची व्याख्याने, मुलाखती, चर्चासत्रे यांचेही आयोजन करण्यात आले आहे. शिवाय, गणेशोत्सवात परंपरा असणारी अविस्मरणीय मिरवणूक या माध्यमातूनसुद्धा ‘ठाणे बदलतंय…’ हा विषय घेण्यात आला आहे. समस्त ठाणेकरांनी या मंडळाला भेट देऊन देखाव्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन दिलीप चंद्रकांत बारटक्के यांनी केले आहे.