◾गणेशोत्सव
बीड-परळी वैजनाथ– येथील गांधी मार्केट येथे कार्यरत असलेली श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी माजलगाव शाखा परळी वैजनाथ येथे सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांच्या हस्ते श्रीची आरती संपन्न झाली. यावेळी त्यांनी बँकेची प्रगती व्हावी असे साकडे घातले.
परळी येथील बँकिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण असणारी बँक आहे. यावेळी मंगलनाथ को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेटचे शाखा अधिकारी गजानन हालगे तसेच बँकेचे सर्व कर्मचारी वृंद आणि त्यांच्यासोबत शिरीष आप्पा सलगरे, रमेश संकाये,आकाश सौंदळे, प्रतीक वारद ,आदी उपस्थित होते.