‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ परळीत

🔶 श्री वैद्यनाथ गणेश महोत्सव

परळी वैजनाथ : ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान आयोजित श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवात आज सोनी मराठी फेम ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने हस्यकल्लोळाची मैफल रंगवली. सर्व उपस्थितांना पोट धरून हसवले.

या कार्यक्रमात हास्य कलाकार नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पृथ्वीक प्रताप, समीर चौगुले, चेतना भट, ओमकार राऊत, यांसह सोनी मराठीच्या चमूने विविध हास्य प्रहसने (स्किट) सादर करत तुफान विनोदी वातावरण निर्माण केले.

तत्पूर्वी परळीतील मान्यवर पत्रकार बांधवांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.