राजस्थानी गणेश मंडळाच्या वतीने दररोज होत असलेल्या श्री गणेश याग (महायज्ञ) कौतुकास्पद उपक्रम-पांडुरंग सोनी, प्रा.बैजुलाल भंडारी सर

🔶 धार्मिक
—————————————————
परळी वैजनाथ – शहरातील राजस्थानी गणेश मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानी गणेश मंडळाच्या वतीने गेल्या वर्षीही गणेश यज्ञ अतिशय उत्तम प्रकारे पार पाडला होता. तसेच यावर्षीही दररोज होत असलेल्या श्री गणेश याग (महायज्ञ) हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सोनी व प्रा.बैजुलाल भंडारी सर यांनी सांगितले.

यानिमित्त दि. 7 ते 17 सप्टेंबर पर्यंत सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत श्री गणेश याग (महायज्ञ) होत आहे. या यज्ञ इंदौर निवासी आचार्य पंडित शिवपुरोहितजी (श्री श्री विद्याधाम) यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा गणेश यज्ञ होत आहे. यासाठी त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. या श्री गणेश यज्ञाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, रविवार, दि.8 सप्टेंबर रोजी दुपारी 4 ते 6 पार्थिव शिवलिंग पुजन होईल. वरील कार्यक्रमाचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजस्थानी गणेश मंडळाचे अध्यक्ष तेजस सोमाणी, सचिव महेश लड्डा व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे.