
◾रेल्वे प्रवास
🔷 गाडी क्रमांक १७२५४ औरंगाबाद-गुंटूर एक्स्प्रेस १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान रद्द.
🔷 गाडी क्रमांक १७२५३ गुंटूर औरंगाबाद एक्स्प्रेस १८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान रद्द
परळी वैजनाथ नांदेड : दुहेरीकरणाच्या कामामुळे मोठा ब्लॉक घेतल्यामुळे औरंगाबाद -गुंटूर व गुंटूर -औरंगाबाद ही एक्सप्रेस गाडी सुमारे पाच दिवसांसाठी रद्द करण्यात आल्यामुळे प्रवासी नागरिकात मोठा संताप व्यक्त होत आहे. नियमित धावणाऱ्या गाड्या अचानक रद्द करणे, मार्गात बदल, किंवा वेळापत्रकात बदल करणे यामुळे प्रवासी नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. किमान अशा सूचना रद्द करण्यापूर्वी प्रवासी नागरिकांना दिल्यास होणारा त्रास, मनस्ताप टाळता येऊ शकतो अशी भावना अनेक प्रवासी नागरिकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
गुंटूर विभागातील गिददलूर- दिगऊवामेटा स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम चालू आहे. या साठी सुमारे पाच दिवसांचा लाइन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यातील नांदेड विभागातील औरंगाबाद-गुंटूर- औरंगाबाद एक्स्प्रेस काही दिवस रद्द करण्यात आली आहे.
🔺गाडी क्रमांक १७२५३ गुंटूर औरंगाबाद एक्स्प्रेस १८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर 🔺गाडी क्रमांक १७२५४ औरंगाबाद-गुंटूर एक्स्प्रेस १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. धावपळ करून प्रवासाचं नियोजन करत तिकीट बुकिंग केल्यानंतर अचानक गाडी रद्द झाल्याचा मेसेज येतो, गाड्यांच्या रद्द होण्यामुळे महिला प्रवाशांची मोठी तारांबळ उडते, मर्यादित पैशांमध्ये प्रवासाला निघालेले लोकांना एसटीचा प्रवास महागडा ठरतो. प्रवाशांची मोठी धावपळ उडत आहे.

