श्रेया विठ्ठल शिवगण हिने पटकावले चित्रकला स्पर्धेत प्रथम पारितोषिक

चित्रकला स्पर्धा

बीड/परळी वैजनाथ .- येथील वैद्यनाथ विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक कै.लक्ष्मणअप्पा साखरे यांच्या 33 पुण्यस्मरणानिमित्त कै.ल.ता.साखरे गुरूजी सेवाभावी संस्थेच्या वतीने मंगळवार रोजी चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
मंगळवार, दि.17 सप्टेंबर 2024 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर चित्रकला स्पर्धेचे उपस्थित शिक्षक, मान्यवरांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. शाळेतील इयत्ता सातवीत शिकणार्‍या कु.श्रेया विठ्ठल शिवगण हिने छोटा गटातून प्रथम पारितोषिक पटकावले आहे. कु.श्रेया शिवगण हिचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला. तिचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंदांनी तसेच नातेवाईकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.