नांदेड-रायचूर एक्स्प्रेस तांडूर- रायचूर दरम्यान रद्द

◾प्रवास/रेल्वे◾ रेल्वे मार्ग देखभाल आणि दुरुस्ती

नांदेड : पाऊस आता काही अंशी कमी झाला आहे,  मोठ्या प्रमाणात प्रमाणातील पावसामुळे रेल्वे मार्गाचे हे नुकसान कमी अधिक प्रमाणात होत असते दरम्यान दक्षिण मध्य रेल्वे विभागात रेल्वे पटरीच्या देखभाल आणि दुरुस्तीकरिता  ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे गाडी क्रमांक १७६६४ नांदेड ते रायचूर एक्सप्रेस १ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत तांडूर ते रायचूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक १७६६३ रायचूर ते नांदेड एक्सप्रेस ही गाडी २ ते १ नोव्हेंबर या कालावधीत रायचूर ते तांडूर दरम्यान धावणार नाही. २२ सप्टेंबर रोजी धावणारी गाडी संख्या ११४०९ दौंड-निझामाबाद एक्स्प्रेस ही गाडी मुदखेड ते निझामाबाद दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

तर २३ सप्टेंबर रोजी धावणारी गाडी नं. ०१४१३ निझामाबाद-पंढरपूर ही विशेष गाडी निझामाबाद-मुदखेड दरम्यान रद्द करण्यात आली आहे. या तारखा दरम्यान प्रवास करणारे सदर सूचना लक्षात घ्यावी.