आई,वडिलांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा – ह.भ.प.तुकाराम महाराज शास्त्री
परळी-आई-वडिलांची सेवा हीच खऱ्या अर्थाने पांडुरंगाची सेवा आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने डॉ. विनायक कराड यांनी परळी येथे आई वडिलांच्या इच्छेनुसार मुंबई सोडून परळीत सुरू केलेल्या हेल्थकेअर क्लिनिकचे जास्त महत्त्व आहे असे मत ह .भ. प. तुकाराम महाराज शास्त्री यांनी केले. ते परळी येथे डॉ. विनायक कराड यांच्या हेल्थ केअर क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
परळी शहरात आयसीआयसी बँकेच्या जवळ नव्याने डॉ.विनायक कराड यांचे हेल्थ केअर क्लिनिक सुरू झाले आहे, ते ए तू कराड सर यांचे सुपुत्र आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी हे होते. मंचावर नवगण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. मधुकर आघाव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते जीवराज ढाकणे, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड, भगवान साकसमुद्रे,अशोक डिगोळे, आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ह. भ. प. तुकाराम महाराज शास्त्री म्हणाले की, डॉक्टरांची समाजाला खूप गरज असते आणि ते काम परळीत होताना दिसते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना बाजीराव धर्माधिकारी यांनी डॉ. विनायक कराड यांनी परळीच्या वैभवात भर घालावी असे आवाहन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मधुकर आघाव तसेच रानबा गायकवाड यांनीही आपले समयोचित मनोगत व्यक्त केले.
. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनायक कराड यांनी केले.त्यांनी मुंबई येथे दहा वर्षे यशस्वीरित्या केलेल्या सेवेची माहिती दिली.सूत्रसंचालन आदर्श शिक्षक ए. तु. कराड यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. विवेक कराड यांनी केले. कार्यक्रमास परळी व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.