आज डेक्कन ओडिसी १७ पाहुण्यांसह संभाजीनगर येथे

PC-Deccan Odyssey Photo Gallery

पर्यटन भ्रमंती  प्रवास

छत्रपती संभाजीनगर : देशातील अनेक पर्यटन स्थळाणा भेट देत पंचतारांकित सोयीसुविधा आणि भव्यतेने नटलेली डेक्कन ओडिसी ही शाही रेल्वे १७ पर्यटकांसह आज सोमवारी (दि.२३) सकाळी ८:३० वाजता रेल्वेस्टेशनवर दाखल होत  आहे.

विदेशी पर्यटकांची  प्रथम पसंती असलेली  पर्यटन हंगामातील पहिल्या डेक्कन ओडिसीतील पर्यटक देवगिरी (दौलताबाद) आणि वेरूळ लेणीला भेट देणार आहेत. देशातील शाही रेल्वेपैकी एक असणारी डेक्कन ओडिसी सन २०२० नंतर गतवर्षी ऑक्टोबरपासून रेल्वे पुन्हा रुळावर आली आहे. गतवर्षी पर्यटन हंगामात ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान ७ डेक्कन ओडिसीने देश-परदेशातील पर्यटक पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले होते. या वेळी पर्यटन हंगामातील पहिली रेल्वे सोमवारी दाखल होत आहे.