भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ:
मुंबई:ब्राह्मण समाजाला स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून 50 कोटीचा भरभरून निधीही उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आज आभार व्यक्त करण्यात आले.
महायुती सरकारने काल पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन केले.अनेक दिवसांपासून जिव्हाळ्याचा प्रश्न शासनाने मार्गी लावला.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार , प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे ,कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांची भेट घेऊन सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आभार मानले.यावेळी ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव धर्माधिकारी,परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे, ब्राह्मण समाजाचे नेते काकासाहेब कुलकर्णी, भाजप महिला आघाडी प्रदेश प्रकोष्ट डॉ. संजीवनीताई पांडे, शशिकांत बिराजदार, श्रीपाद पाठक आदी उपस्थित होते