मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणीः राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी

पवार साहेबांना धोका देणा-याला जनता माफ करणार नाही-राजेभाऊ फड

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष, परळी तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते राजेभाऊ फड यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर परळीचे आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार हे नवीन चेहऱ्याच्या शोधात असून इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर आज राजेभाऊ फड यांना पक्षात घेत पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे.
मुंबईत आज शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे,आमदार जितेंद्र आव्हाड,आ. रोहित पवार, बीड जिल्ह्यातील खासदार बजरंग सोनवणे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत राजेभाऊ फड यांनी आपल्या समर्थकांसह हाती तुतारी घेतली.
राजेभाऊ फड यांनी पक्ष प्रवेशावेळी बोलताना सांगितले कि,देशाच्या राजकारणात खा.शरद पवारांचे नावलौकीक आहे अश्या जाणत्या राजाने धनंजय मुंडेंना विरोधी पक्ष नेता,सामाजिक न्याय मंत्री व बिड जिल्ह्याचे पालकमंत्री केले राजकारणात मोठे केले परंतु गद्दारी करत शरद पवार साहेबाना धोका दिला या धोक्याचा बदला जनता घेणारच आहे,पीक विम्यात प्रचंड घोटाळा झाला आहे या बाबत मी कोर्टात पीआय एल दाखल करणारच आहे.तिर्थक्षेत्र योजना,नगरोत्थान योजनेत ही कामे न करता बीले उचली आहेत,परळी मतदारसंघात प्रचंड दादागिरी करत चालु आहे विरोधांकावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत याचा बदला उद्याच्या निवडणुकीत घेण्यासाठी सज्ज झाली आहेत.या निवडणुकीत शरद पवार साहेबा बरोबर केलेल्या गद्दारारीचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही असे पक्ष प्रवेशावेळी युवानेते राजाभाऊ फड यांनी सांगितले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी राहिलेले राजेभाऊ फड हे कन्हेरवाडी गावचे सरपंच आहेत. तसंच त्यांनी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालकपदही भूषवलेलं आहे. परळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत. त्यांना शरद पवारांकडून तिकीट दिलं जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान यावेळी श्री सोपानराव तोंडे युवा नेते सौ. मंगलताई श्रीकृष्ण सोळंके ( जिल्हा सरचिटणीस भाजपा ) श्री प्रमोद किरवले ( माजी जिल्हा परिषद सदस्य बीड ) डॉ जान मोहम्मद शेख (जिल्हा संघटक शिवसेना शिंदे गट बीड ) विक्रम रमेश देशमुख ( उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते ) अश्विनी नागोराव सोळंके ( माजी सरपंच नागापूर परळी ) कुसुमताई शिंदे ( माजी सरपंच जयगाव ) सतीश कुंडगीर ( माजी सरपंच कौडगाव घोडा परळी ) यांच्यासह हाती तुतारी घेतली.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी राहिलेले राजेभाऊ फड हे कन्हेरवाडी गावचे सरपंच आहेत. तसंच त्यांनी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालकपदही भूषवलेलं आहे. परळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत. त्यांना शरद पवारांकडून तिकीट दिलं जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.