दुःखद
परळी प्रतिनिधी-येथील बँकनी कॉलनी भागातील रहिवाशी असलेले वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक नामदेवराव भागवत यांचे आज दि.26 गुरुवार रोजी सकाळी 9:30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे दुःखद निधन झाले आहे.
आज संध्याकाळी 8:30 वाजता परळी येथील अमर धाम येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.परळी शहरातील बँकिंग व्यवसायातील शांत, व्यक्तिमत्व असलेले वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक शिंपी समाजाचे ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यापारी नामदेवराव भागवत यांचे आज दिनांक 26 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9:30 वाजता दुःखद निधन झाले.
भागवत पॅलेस व भागवत मंगल कार्यालय याचे नरेंद्र भागवत मनोज भागवत यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर आज दि.26 गुरुवार रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंतयात्रा राहते घर बँक कॉलनी येथून निघणार आहे.