राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती

पदोन्नती
परळी/  प्रतिनिधी- संभाजी नगर-परळी  पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
अविनाश बारगळपोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.
 मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व सहायक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गामध्ये वर्ग करण्यास मान्यता देण्यांत आलेली आहे.  पोलीस उपनिरीक्षक (Grade PSI) संबोधण्याकरिता पोलीस अधीक्षक, बीड आस्थापना मंडळाची बैठक दिनांक १८/९/२०२४ रोजी आयोजित करण्यांत ‘आली होती. यानुसार परळी येथील संभाजी नगर पोलीस ठाण्याचे एएसआय राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. या निवडीबद्द्ल राजाराम शेळके यांचे सर्व मित्र परिवार, नातेवाईकांकडून अभिनंदन होत आहे.