हॉलीवुड चित्रपट 🔺 ८९ वर्ष वय🔺 उत्कृष्ट अभिनेत्री आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री 2 ऑस्कर पुरस्कार जिंकले.
जगभरात आणि विशेषता युवक युवतीत लोकप्रिय झालेला हॅरी पॉटर चित्रपटातील’ सिरीजमधील प्रोफेसर मॅकगोनागलच्या भूमिकेतून डेम मॅगी स्मिथ सर्वाधिक लोकप्रियता झाल्या. ‘डाउनटन अॅबे’ या चित्रपटांमध्ये काम केलेली हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचे निधन झाले आहे. त्या 89 वर्षाच्या होत्य
त्यांची मुले टोबीस्टीफन्स आणि ख्रिस लार्किन यांनी समाज माध्यमावर लिहिताना लिहिले – ‘अत्यंत दुःखद बाब कळवत आहोत की मॅगी स्मिथ यांचे निधन झाले आहे. 27 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
🔷 मॅगी स्मिथ दोन ऑस्कर मिळवलेली अभिनेत्री
मॅगी यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोन ऑस्कर पुरस्कार जिंकले. त्यांनी 1970 मध्ये ‘द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर आणि 1978 मध्ये ‘कॅलिफोर्निया सूट’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळवला.