विधानसभा परळी मतदारसंघात आता एमआयएमची ही उडी.

वारे निवडणुकीचे – विधानसभा-निवडणूक 2024 

परळी वैजनाथ  /प्रतिनिधी- पत्रकार परिषदेत एमआयएमचे परळी तालुका अध्यक्ष यांनी एमआयएम ही परळी विधानसभा लढवणार असल्याची घोषणा केली.विद्यमान कृषिमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या विधानसभा मतदारसंघात यावेळेस इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी झाली आहे.

ए.आय.एम.आय.एम चे परळी तालुका अध्यक्ष शेख शरीफ भाई यांच्या संपर्क कार्यालयात (दि 2) ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यात परळी विधानसभा एम आय एम लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी झालेल्या चर्चेत बीड जिल्ह्यातील बीड, माजलगाव, आणि परळी हे तीन विधानसभा मतदारसंघ एमआयएम लढवणार असल्याचे ते म्हणाले.

या परिषदेत त्यांनी परळीचे आमदार आणि कृषी मंत्री, तसेच नगरपालिका, आणि सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या अन्याय बद्दल घणाघात केला. ए.आय.एम.आय.एम परळीची निवडणूक लढवणार आणि जिंकणारच, सर्वसामान्य जनतेस आणि सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही लढणार आहोत दरम्यान पुढे बोलताना परळीचा व्यापार मराठवाड्यात प्रसिद्ध होता परंतु परळीच्या राजकीय नाकर्तेपणा मुळे तो लोप पावला आहे, तसेच दादागिरी, दहशत, दबाव त्या कारणाने परळीचा व्यापारी वर्ग हा स्थलांतर करत आहे. व्यापाऱ्यांचे व्यवसाय, एजन्सीज हिसकावून घेतल्या जात आहेत.शहरातील शदिखाना, बुद्धीविहार, वाचनालय,नाट्यगृह यांची अवस्था दयनीय आहे. परळीचे ड्रेनेज चे काम अनेक दिवसांपासून अपूर्ण असून शहरातील अर्ध्याच भागात काम झाले असून १०% केवळ काम झालेले आहे. शासनाने दिलेल्या निधीद्वारे तीर्थक्षेत्र विकास योजनेद्वारे सुरू असलेली कामे आणि ईतर योजनेतील अनेक कामे प्रलंबित आहेत. यात भालचंद्र वाचनालय, नटराज रंगमंदिर, अल्पसंख्यांक मुस्लिम समाजासाठी ची शादीखाणे, कब्रस्थान, अल्पसंख्याक मुलांचे वस्तीगृह ही कामे मागील दहा वर्षापासून काम सुरू असून अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाहीत.

शहरातील नागरिकांना शहरातील सातत्याने चालू असलेल्या कामामुळे धूळ चिखल आणि असुविधेला सामोरं जावे लागते. या सर्व बाबींमुळे ए.आय.एम.आय.एम परळीची विधानसभा निवडणूक लढणार असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान समविचारी पक्षाशी विचार विनिमय करून प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी मराठा समाजाच्या सहकार्याबद्दल तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू आहे. एम आय एम, चे खासदार इम्तियाज जलील हे  मराठा समाज आणि वंचित बहुजन आघाडीचे आम्ही एकत्रित युती करण्याचाही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितल.