दहावीच्या परिक्षेला सुरुवात

परळी गटशिक्षण कार्यालय अंतर्गत एकुण १९ केंद्र
◾ परळी तालुका १५, सोनपेठ ४

परळी/प्रतिनिधी
कोरोना काळात दोन वर्षे बोर्डाच्या परिक्षा झाल्या नाहीत, ९ वीच्या परिक्षेवर व अंतर्गत मुल्यांकनावर विद्यार्थी पास करण्यात आले. मागच्या वर्षी बोर्डाची परिक्षा झाली पण ज्या त्या शाळेला परिक्षा केंद्र देण्यात आले होते. गेल्या तीन वर्षानंतर यंदा खुल्या वातावरणात १० वी बोर्ड परिक्षेला सुरुवात झाली असून तालुक्यात १५ परिक्षा केंद्रावर ४ हजार ८२६ विद्यार्थी १० वीची परिक्षा देत आहेत.

तीन वर्षानंतर परिस्थिती पुर्वपदावर आल्याने पुर्वीप्रमाणे १० वी व १२ वीच्या बोर्ड परिक्षा घेणार असल्याचे शिक्षण मंडळाने घोषित केले होते. त्याप्रमाणे यंदा गुरुवारी (ता.०२) मराठीच्या पेपर पासून १० वीच्या परिक्षेला सुरुवात झाली आहे. तालुक्यात गुरुवारी झालेल्या परिक्षेत एकुण १५ परिक्षा केंद्रावर परिक्षा सुरू झाली असून परिक्षेसाठी ४ हजार ८२६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात ऐनवेळी ३ विद्यार्थी वाढले. असे एकुण ४ हजार ८२९ विद्यार्थी मराठी पेपर देणार होते. पहिल्याच पेपरला १२१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. ४ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. विद्यार्थ्यांना सराव नसल्याने शिक्षण मंडळाने ऐनवेळी १० मिनिटे परिक्षेसाठी वाढवून दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

परिक्षा काँपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या असून सर्व केंद्रावर बैठे पथक ठेवण्यात आले आहे. तसेच अनेक भरारी पथके तयार करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर परिक्षा केंद्र परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. यामुळे शहरातील परिक्षा केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता