श्री ष.ब्र. 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज-सोनपेठकर यांच्या हस्ते छतभरणी प्रारंभ

परळी वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क -श्री संतश्रेष्ठ गुरूलिंग स्वामी मंदिर येथील चालू असलेल्या बांधकामाची श्री ष.ब्र. 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज-सोनपेठकर यांच्या हस्ते आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर छतभरणी करण्यात आली.
ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरातील वीरशैव लिंगायत समाजाचे श्री गुरुलिंग स्वामी मंदिराच्या भक्त निवासाचे काम मागील महिन्यापासून सुरू आहे. गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर भक्तनिवासच्या तळमजल्यावरील छतभरणी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यासाठी श्री ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज-सोनपेठकर हे उपस्थित होते. यावेळी शिवाचार्य श्री ष.ब्र.108 नंदिकेश्वर महाराजांनी या बांधकामासाठी वीरशैव लिंगायत समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन केले.
 या पवित्र कामासाठी आपल्या आईवडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ बांधकामासाठी दान करून त्यांच्या स्मृती कायम समाजाच्या स्मरणात राहतील. बेलवाडी येथे कायमच अन्नदानाची परंपरा असल्याने बांधकामासाठी देणगीची तकमतरता पडणार नाही. ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री संतश्रेष्ठ गुरूलिंग स्वामी मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामात भक्तांच्या निवास व्यवस्थेसाठी खोल्या, आधुनिक स्वयंपाक गृह व सभागृह होणार असल्याचे अध्यक्ष दत्तात्रय ईटके गुरुजी यांनी यावेळी सांगितले.
या छतभरणी कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सोमनाथ अप्पा हालगे, श्री संतश्रेष्ठ गुरूलिंग स्वामी मंदिराचे विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे, सचिव ऍड.गिरीश चौधरी शिवकुमार व्यवहारे, अक्षय मेनकुदळे, वकरेश्वर मंदिराचे विश्वस्त नारायण अप्पा खके, चंद्रकांत अप्पा समशेट्टे, सुभाष भिंगोरे, दयानंद स्वामी, श्याम बुद्रे, प्रकाश खोत, श्रीमती प्रेमला ताई वेरूळे, श्रीमती गोदावरी बाई चौधरी, महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुका अध्यक्ष महादेव इटके, विकास हालगे, गणपत हरंगुळे, रंगनाथ अप्पा इटके, रामलिंग अप्पा राजनाळे,  महात्मा हत्ते, प्रभूअप्पा कापसे, दत्ता गोपनपाळे, चंद्रकांत उदगीरकर, शिवकुमार चौंडे, उमाकांत पोपडे, संजय कोरे, गौरीशंकर मोदी, शिवप्रकाश चौधरी, उदय ओपळे, गणेश स्वामी, सुरेश स्वामी शंकर साखरे व वीरशैव समाजातील महिला भजनी मंडळाच्या सदस्या व वीरशैव लिंगायत समाजबांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रंगनाथ अप्पा खके गुरुजी यांनी केले.