डिजिटल मीडिया
एस एम देशमुख राहणार उपस्थित
बीड -गेवराई ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल उद्या दिनांक 6 ऑक्टोबर रोजी गेवराईत त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यास अ भा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख उपस्थित राहून मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास पत्रकारांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे, गेवराई तालुकाध्यक्ष अविनाश इंगावले यांनी केले आहे.
डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या प्रदेशाध्यक्षपदी बीड जिल्ह्याचे सुपुत्र अनिल वाघमारे यांची तर प्रदेश कार्याध्यक्षपदी संतोष शिंदे आणि कार्यकारणी सदस्य पदी जितेंद्र सिरसाट यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा उद्या दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह गेवराई येथे गेवराई तालुका डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यास मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस एम देशमुख हे आवर्जून उपस्थित राहणार असून तालुक्यातील सर्व प्रेस व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. याप्रसंगी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल सोळुंके, गेवराई तालुकाध्यक्ष मधुकर तौर यांच्यासह मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास गेवराई, परळी , आंबाजोगाई, केज, बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, धारूर, माजलगाव या तालुक्यातील सर्व मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या पत्रकार बांधवांनी आवर्जून बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे, डिजिटल मीडिया परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष अविनाश इंगावले यांच्यासह डिजिटल मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.