तेली समाजाच्या वतीने दांडिया महोत्सवाचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
बीड – परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तेली समाजाचा दांडिया महोत्सव स्त्रीयांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी केले. ते तेली समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दांडिया महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. येथील श्री. वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनि मंदिरात तेली समाजाच्या वतीने नवरात्री निमित्त तेली समाज सार्वजनिक दांडीया उत्सव समितीच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी दांडीया उत्सव २०२४ चे आयोजन ०४ ते ११ आँक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे.
या महोत्सवात महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. यामध्ये फ्रिज, ओव्हन, डिजिटल वाँच आदी आकर्षक बक्षिसे दांडिया सोबत मिळवण्याची संधी महिलांना मिळणार आहे. या दांडिया महोत्सवाचे उद्घाटन परळीचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, वैद्यनाथ बँकेचे माजी व्हाईस चेअरमन व समाजातील जेष्ट विठ्ठलआप्पा चौधरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
पुढे बोलताना दिपक देशमुख म्हणाले की, युवानेते पवन फुटके यांनी समाजातील महिलांसाठी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे त्याचा लाभ समाजातील जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा. यावेळी उद्घाटन कार्यक्रमास महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक चंद्रकांत उदगीरकर,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेचे सचिव प्रा.मधुकर शिंदे,श्री शनैश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर जठार, नागनाथ भाग्यवंत, चंद्रशेखर फुटके, प्रा प्रविण फुटके, प्रा गणेश परळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तेली समाज दांडिया उत्सव समितीचे अध्यक्ष पवन फुटके, सोमनाथ वाघमारे, मोहन राजमाने, अशोक रोकडे, दिपक धसकटे, राजकुमार भाग्यवंत, सचिन लासे, सतिष फुटके, ईश्वर राऊत,रवी अन्नपुर्णे, शंकर कौले, दिपक साखरे, ईश्वर जठार, प्रकाश नकाते,सुनील क्षीरसागर, सुजित क्षिरसागर, प्रदिप पिंपळे, प्रसाद जठार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा फुटके यांनी तर सुत्रसंचालन प्रा डॉ मेहत्रे (चौधरी) मँडम यांनी केले. आभार चंद्रशेखर फुटके यांनी मानले.कार्यक्रमास समाजातील महिला भगिनी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

