मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक कार्यकारीणीच्या कुंटूंबातील सदस्यांना तब्बल 13 वर्षानंतर न्यायालयीन लढ्यात यश
नवीन कार्यकारिणी अध्यक्ष, सचिवांनी पत्रकार परिषदेत दिली माहीती .
बीड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेल्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक कार्यकारीणीच्या कुटूंबातील सदस्यांना तब्बल 13 वर्षानंतर न्यायालयीन लढ्यात यश प्राप्त झाले आहे. दरम्यान धर्मादाय आयुक्त, बीड यांनी सोसायटीच्या नवीन कार्यकारीणीला कामकाज करण्यासाठी मान्यता दिली असून नवीन कार्यकारीणी पुढील प्रमाणे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, उपाध्यक्ष अरूण अर्धापुरे, सचिव अमर देशमुख आदींची निवड झाली आहे.
कै.राजेसाहेब देशमुख व प्रा.माधवराव अर्धापुरे या दोघांनी मिळून 1971 साली मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून लिट्ल फ्लॉवर इग्लिश स्कुल ही शाळा सुरू केली. विशेष म्हणजे बीड जिल्हयातील पहिली इग्लिश स्कुल म्हणून या शाळेची इतिहासात नोंद आहे. तसेच लिट्ल फ्लॉवर कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालय असे 3 युनिट सुरू आहेत. या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, सचिव प्रा.माधवराव अर्धापुरे, भानुदासराव देशमुख, मंचकराव देशमुख, प्रभुअप्पा हालगे, महेशअप्पा खानापुरे, डॉ.शामराव ढाकणे, सुधाकरराव देशमुख, सुवालालजी वाकेकर, मदनलालजी वाकेकर, नंदकिशोरजी जाजू, ही कार्यकारीणी होती.
यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्यानंतर 2006 रोजी अमर राजेसाहेब देशमुख (अध्यक्ष) भानुदासराव देशमुख (उपाध्यक्ष), राजेश विठ्ठलराव देशमुख (सचिव), बाळासाहेब (अंनत) मंचकराव देशमुख (कोषाध्यक्ष) राजेसाहेब देशमुख (सहसचिव) ही कार्यकारीणी झाली होती नंतर अंतर्गत वाद झाल्यामुळे 2011 साली न्यायालयात वाद गेला. 2024 रोजी न्यायालयामध्ये (धर्मादाय आयुक्त) संस्थापक कार्यकारणीच्या कुंटूंबातील सदस्यांनी न्याय मागणीसाठी पुरावे दाखल केले होते या पुराव्याच्या आधारे 13 वर्षानंतर त्यांना न्यायालयीन लढ्यात यश आले. दि.08 सप्टेंबर 2024 रोजी सोसायटी सदस्यांच्या मागणीनूसार सोसायटीने निवडणूक प्रक्रिया करून नवीन कार्यकारीणी निवडली असून त्यांचा प्रस्ताव धर्मादाय आयुक्ताकडे दाखल केला होता. धर्मादाय आयुक्तांनी सदरील कार्यकारीणीला कामकाज करण्यासाठी मान्यता दि.30 सप्टेंबर 2024 रोजी दिली. या न्यायालयीन लढ्यामध्ये ॲड.राम औटे, ॲड.मेहुल तोतला यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
13 वर्षे बेकायदेशीर कारभार- मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचा 13 वर्षे बेकायदेशीर कारभार झाला असून सदरील कारभार सन 2011 ते 2024 या दरम्यान झाला आहे. हा कारभार 1 विरूध्द 12 असे असताना एकाकी हुकूमशाहीच्या पध्दतीने सोसायटीचा कारभार सुरू होता. या कारभारा विरोधात संस्थापक कार्यकारीणी कुंटूंबातील सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली असता त्यांना या न्यायालयीन लढ्यात यश आले.
संस्थापक देशमुख व अर्धापुरे यांचे स्वप्न साकार- मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजेसाहेब देशमुख सचिव प्रा.माधवराव अर्धापुरे यांचे आज रोजी स्वप्न साकार झाले असून त्यांच्याच कुंटूंबातील सदस्याकडे सोसायटीचा कारभार गेल्यामुळे संस्थेला गत वैभव प्राप्त होणार आहे.
सोसायटीची नवीन कार्यकारीणी- मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची नवीन कार्यकारणी अध्यक्ष बाळासाहेब (अनंत) मचकराव देशमुख, उपाध्यक्ष प्रा.अरूण माधवराव अर्धापुरे, सचिव अमर राजेसाहेब देशमुख, कोषाध्यक्ष अनिल शेषेराव चव्हाण, सहसचिव चंद्रकांत बाबुअप्पा कोरे, सदस्य रमेश हरिश्चंद्र पाटील, दत्तात्रय गोविंदराव शिंदे, यांची निवड झाली आहे. यावेळी सोसायटीचे सभासद नरेश प्रभुअप्पा हालगे, पंकज शरदराव लोमटे, चंद्रप्रकाश प्रभुअप्पा बुरांडे, ॲड.अजिक्य प्रकाशराव देशमुख, विजय राजेसाहेब देशमुख आदी उपस्थित होते.