रेल्वे प्रवास / लूटमार
परभणी-परळी वैजनाथ परभणी ही नेहमी व्यस्त असणारी रेल्वे लाईन आहे. मात्र मागील 8 दिवसात या मार्गावर सिग्नलमध्ये बिघाड करून गाडी मधील प्रवास करणाऱ्या नागरिकाना लुटण्यात फिल्मी स्टाईल लूटमार होत आहे सिकंदराबाद-साईनगर शिर्डी काकीनाडा एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना शनिवारी (५ ऑक्टोबर) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गंगाखेड ते नृसिंह पोखर्णीदरम्यान घडली. दोन ते तीन चोरट्यांनी सिग्नलमध्ये बिघाड करून ही रेल्वे थांबवली.
परळी स्थानकातून निघालेल्या या गाड्या मध्यरात्रीच्या सुमारास गंगाखेडच्या पुढे असतात. यापूर्वी १ ऑक्टोबरला गंगाखेड-वडगावदरम्यान याच पद्धतीने नागपूर-कोल्हापूर रेल्वे थांबवून, चोरट्यांनी प्रवाशांचे २३ ग्रॅम सोने चोरले होते. त्यामुळे ५ दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा हा प्रकार घडला.गंगाखेड ते परभणीदरम्यान पोखर्णी रेल्वेस्थानकावर सिग्नलमध्ये बिघाड करून चोरट्यांनी मध्यरात्री सिकंदराबाद-साईनगर शिर्डी रेल्वे थांबवली. माहिती मिळताच आरपीएफ जवानांनी पाहणी केली. या घटनेने गाडी तासभर खोळंबली.दरम्यान प्रवाशनी काळजी घ्यावी अस कळविण्यात येत आहे.

