आई राजा उदे-उदे श्री तुळजाभवानी देवीची गरूड वाहनातून छबिना

छायाचित्र -साभार सनातन प्रभात

शारदीय नवरात्र उत्सव
मंदिर परिसर आई राजा उदे-उदेच्या गजराने दुमदुमला

धाराशिव-तुळजापूर  : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रातील चौथ्या माळेनिमित्त रविवारी सकाळी अभिषेक पूजा झाली. यानंतर देवीस नैवेद्य दाखवून केशरी रंगाचे महावस्त्र नेसवून विविध रंगीबेरंगी फुलांचा सुवर्णालंकार घालून महापूजा मांडण्यात आली होती.

हजारो भाविकांनी या महापूजेचे दर्शन घेतले. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापुरात भाविक श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करीत आहेत. रविवारी चौथ्या माळेनिमित्त पहाटे ६ ते सकाळी १० या वेळेत देवीची अभिषेक पूजा पार पडली. केशरी रंगाचे महावस्त्र शनिवारी रात्री तिसऱ्या माळेनिमित्त अभिषेक पूजेनंतर देवीला केशरी रंगाचे महावस्त्र,
अलंकार चढविण्यात आले. यानंतर धूप आरती करून श्री तुळजाभवानी देवीजींच्या मंदिरात गरुड वाहनावरून छबिना
मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी प्रक्षाळ पूजाही पार पडली. यानंतर आरती झाली. आई राजा उदे- उदेचा गजर करीत हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविकांनी देवीच्या चरणी माथा टेकविला.