🔸मराठी साहित्यिक कुंभमेळा – 🔸 ९८ वर्षांच्या इतिहासात सहाव्या महिला अध्यक्ष 🔸संमेलन २१, २२, २३ फेब्रुवारी दरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये होत आहे.
पुणे / नागपूर:- मराठी साहित्य विश्वात महत्वपूर्ण असलेल्या आणि दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्येष्ठ साहित्यिक, लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी रविवारी पुण्यात ही घोषणा केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आतापर्यंत १४६ वर्षांच्या इतिहासात ८३ वर्षीय तारा भवाळकर या सहाव्या महिलेला हा मान मिळाला आहे. हे संमेलन २१, २२, २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहे.
वैचारिक, लोकसाहित्य, लोकसंस्कृती या विषयांवर लेखन करणाऱ्या लेखिका डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ रोजी झाला. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी पुण्यातील ललित कला अकादमी आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत अतिथी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांचा लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा व लोककला या विषयांच्या लेखनामध्ये गाढा अभ्यास आहे. लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्रीजाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केले
आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांनी आपले योगदान दिले आहे.
🔸अ. भा मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्षा
🔸 कुसुमावती देशपांडे (१९६१, ग्वाल्हेर) 🔸 दुर्गा भागवत (१९७५, कराड) 🔸 शांता शेळके (१९९६, आळंदी) 🔸डॉ. विजया राजाध्यक्ष (२००१, इंदूर) 🔸अरुणा ढेरे (२०१८, यवतमाळ)