हास्य चित्रकार शि.द फडणीस यांना चतुरंग जीवनगौरव पुरस्कार

🔷 ८ डिसेंबरला पुण्यात पुरस्कार प्रदान सोहळा

🔶 कला विश्व- जीवन गौरव

पुणे-साहित्यिक, शैक्षणिक आणि संस्कृतिक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान बद्दल चतुरंग प्रतिष्ठान चा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती ‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे देण्यात आली आहे.मानपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यंदा या पुरस्कारासाठी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील सुधीर जोगळेकर, दीपक घैसास, डॉ. सागर देशपांडे, दीपक करंजीकर, सारंग दर्शने आणि धनश्री लेले यांच्या निवड समितीने ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांची एकमताने निवड केली आहे. हा पुरस्कार १९९१ पासून देण्यात येतो. पुरस्कार प्रदानाचा रंगसंमेलन सोहळा’ ८ डिसेंबर रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.