नैतिकता आणि विश्वासाचा उद्योजक
🔶 वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास🔺आज दुपारी चार वाजता मुंबई येथे अंत्यसंस्कार
मुंबई– देशभरात घराघरात पोहोचलेलं टाटा हे नाव आत्मीयतेचं होतं. आपलेपणाचे होतं.समस्त भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेले उद्योगपती आणि टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने जागतिक आणि देशभरातील लोकांचे प्रेरणास्थान उद्योगजगात सर्वत्र टाटा म्हणजे विश्वास असं एक समीकरण बनलं होतं .
संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 1937 मध्ये मुंबईत जन्म झालेले रतन टाटा हे नाव भारताच्या घराघरांत विश्वासाचे प्रतीक म्हणून घेतले जाते. त्यांच्या निधनाने उद्योगजगताचा लखलखता ध्रुवतारा निखळून पडला. सोमवारपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी हॉस्पिटल मुंबई येथे उपचार चालू होते ,
आज दुपारी चार वाजता मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहे.
🔶 समाजाला चांगले बनवण्यासाठी ची कटिबद्धता असणारा उद्योजक – पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांचे निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांनी विनम्रता , दयाभाव आणि समाजाला चांगले बनवण्यासाठीची त्यांचे कटिबद्धता यामुळे टाटा यांनी सर्वांची मने जिंकली होती असे ते म्हणाले.